सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो शेअर करण्याचं वेड तर सगळ्यात तरुण-तरुणींना आहे. एवढंच काय तर आता वद्ध देखील यामध्ये उतरले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी देखील अनेक मंडळी अगदी काहीही करण्याची तयारी दाखवतात. पण आतात हेच रिल्स करणं, बिहारमधील सुपौलमध्ये राहणाऱ्या एका सुनेच्या जीवावर बेतलं आहे. सुनेला रील बनवणं एवढं महागात पडलं की, तिला थेट रुग्णालयात दाखल करावे लागलं. सुनीत देवी असे या सुनेचे नाव असून ती रील बनवत होती पण तिची ही गोष्ट तिच्या सासऱ्यांना मुळीच आवडत नव्हती. ती आपल्या पंरपरा, संस्कृती मोडत असल्याचे समजत त्यांनी तिच्यावर काठीने हल्ला केला एवढचं नाहीतर, तिचं डोकं फोडल आहे.
सुनीता देवी या 26 वर्षीय असून करजाईन पोलिस स्टेशनच्या जवळील परिसरात राहणाऱ्या आहेत. सुनीताने तिच्या नवऱ्याला सांगून रविवारच्या व्रतांचे रील शूट केलं त्यानंतर ते आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. रील पाहिल्यानंतर सासू- सासऱ्यांना तिचा खूप राग आला. या संतापलेल्या सासऱ्यांने तिच्यावर काठीने हल्ला केला. दरम्यान तिचे डोकं फोडलं. सुनेच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. पत्नीला रक्तबंबाळ अवस्थेत पतीने जवळचे रुग्णालय गाठले. तिच्यावर उपचार करण्यात आले. विचारपूस केली असता, रील बनवण्याच्या रागातून सासू- सासऱ्यांनी तिला मारहाण केली. तसेच तिचं डोकं फोडले. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस चौकशी करत आहेत.