ताज्या बातम्या

Chhaava On OTT : 'आले राजे आले!'; 'छावा' चित्रपट उद्या ओटीटीवर होणार प्रदर्शित

'काळाच्या ओघात कोरलेल्या धैर्य आणि वैभवाच्या कथेचे साक्षीदार व्हा', अशा शब्दांत 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मने छावा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.

Published by : Rashmi Mane

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उद्या, ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. लेखक शिवाजी सावंत यांच्या 'छावा' कांदबरीवर आधारीत बनविण्यात आलेल्या या हिंदी चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

'छावा' चित्रपटाने सलग ५६ दिवस चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचली असून भारतात जवळपास ६०० कोटींचा गल्ला कमवला. हा या वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट ठरला आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गोष्ट सांगण्यात आली असून औरंगबेजाने कशा पद्धतीने त्यांचा मरण यातना दिल्या, हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपट पाहून देशभरात पुन्हा एकदा औरंगजेबविरोधी भावना उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता छोट्या पडद्यावर 'छावा' चित्रपटाचे आगमन होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद