ताज्या बातम्या

अब्दुल सत्तार यांच्या पीए आणि समर्थकांकडून सिल्लोडमध्ये सामाजिक कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह समर्थकांनी सिल्लोडमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच समोर आलं आहे.

Published by : shweta walge

अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह समर्थकांनी सिल्लोडमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच समोर आलं आहे. तसंच त्याला जीवे मारण्याची दिली धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्या तक्रारीवरून अल्पसंख्यांक मंत्र्यांच्या पीएसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, अब्दुल सत्तार यांचे पीए बबलू चाऊस , शाकीर मिया जानी, बबलू पठाण यांच्यासह दोन जणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. दरम्यान सिल्लोडमध्ये शहरातील सर्वे नंबर 92 मधील केलेल्या आक्षेपार्ह फेरफाराबद्दल तलाठी भवन येथे सुनावणी होती. सुनावणी संपल्यानंतर बाहेर पडल्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर शंकरपल्ली यांनी जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार