समय रैनाचा 'इंडियाज गॉट लॅटेंट' हा शो चांगलाच चर्चेत राहिला आहे. या शोदरम्यान आई-वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रणवीर अलाहबादिया चांगलाच चर्चेत आला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. या सगळ्यामुळे न्यायालयाने त्याच्या सगळ्या शोचे प्रदर्शन रोखले होते. दरम्यान त्याने पॉडकास्ट पुन्हा सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीदेखील केली होती. यावर आता न्यायालयाने निर्णय दिला आहे.
रणवीरने दाखल केलेल्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला दिलासा दिला असून त्याचा पॉडकास्ट शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या अटकेलाही स्थगिती मिळाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, शो प्रदर्शित करण्यासाठी काही नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ‘शो’मध्ये सभ्यतेचे नियम पाळले जावेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत काही नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. जे संविधानाच्या कलम १९ (४) अन्वये देण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराला बाधा आणणार नाहीत.