Caste Certificate 
ताज्या बातम्या

Caste Certificate : आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अल्पवयीन मुलीला देण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे एससी प्रमाणपत्र जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Caste Certificate) अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे एससी प्रमाणपत्र जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशाने एका निर्णयात तिच्या आईच्या 'आदि द्रविड' जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जारी करण्यास मान्यता दिली आहे.

शिक्षणाशी संबंधित आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय दिला आहे. मुलीची आई हिंदू आदि द्रविड जातीची असून त्या आईने मुलांसाठी एससी प्रमाणपत्राची मागणी केली होती. लग्नानंतर पती माझ्या माहेरीच राहतो. मुलंही इथंच शिकले सर्वच सदस्य हे अनुसूचित जातीचे आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्यानं आईच्या जातीच्या आधारे मुलीला एससी प्रमाणपत्र देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला विरोध केला होता.

Summery

  • मुलीला आईच्या जातीचे मिळाले प्रमाणपत्र

  • सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  • मराठा आरक्षणासंदर्भात होणार मोठा फायदा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा