ताज्या बातम्या

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; बैलगाडा शर्यतीला मिळाली परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यावर कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध आहे तसेच कायद्यात केलेले बदल हे समाधानकारक आहेत. त्यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी नाही. असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

Mumbai Rain Updates : मुंबईमध्ये पावसाचा कहर ; अनेक ठिकाणी साचलं पाणी

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला अखेर पृथ्वीवर परतले ; भारताची मान गर्वाने उंचावली

Dahisar : एकसर भूखंड प्रकरण ; महापालिकेचा 349 कोटींचा भूखंड अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत