महाराष्ट्रामध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता CBSC पॅटर्न लागू करण्याची घोषणा काल दादा भुसे यांनी केली. या घोषणेनंतर शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. अशातच आता राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. CBSC सुरु करून SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपदेखील सुप्रियं सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षणाची परंपरा आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तो अत्यंत खेदजनक आहे. या माध्यमातून SSC बोर्ड पूर्णत: बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. संत, सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसली तर जाणार नाही ना अशी शंका वाटते. हा निर्णय अभिजात मराठी भाषा, संस्कृति आणि परंपरेला मारक ठरणारा आहे. माझी सरकारला नम्र विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार करावा".