गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ज्या घटनेने हादरवलं आहे. त्या सातारा फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे हिच्या प्रकरणात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील जोर लावल्याच पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर सुप्रिया सुळे बीडमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी आज मृत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची घेतली आहे. तसेच संपदा मुंडेच्या कुटुंबीयांचे सांत्वन देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. दरम्यान यानंतर त्या सकाळी 9.30 वाजता कवडगाव येथे देखील जाणार असल्याची माहिती समोर आली होती.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "अतिशय अस्वस्थ करणारी हि घटना आहे. हि आत्महत्या आहे कि हत्या आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. सरकारकडुन गलिच्छ स्टेटमेंट येत आहेत हे अस्वस्थ करणारं आहे.. देशमुख प्रकरण संदिप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांनी मांडलं.. अमित भाई शहांचे आभार मानते.. देशमुख प्रकरण आमच्याकडुन ऐकुन घेतलं. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाहीत."
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, "प्रकरण दाबायची भावना महाराष्ट्राच्या आणि कुटुंबाच्या देखील मनात आली आहे. बजरंग बप्पा आणि संदिप भैयांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. हा विषय त्यांच्या कानावर घातलेला आहे. तपास करून न्याय देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. अमित भाई शहांच्या कानावर हे प्रकरण बजरंग बप्पा घालतील. राजकारण बाजुला ठेवून आम्ही न्याय देण्यासाठी उभे राहु. ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेणार.. कुठल्याही केसमध्ये राजकीय दबाव."