पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणी फरार आरोपी मेहुल चोक्सिला बेल्जियममध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पुतण्या नीरव मोदीसह 13500 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँकेत कर्ज घोटाळा केल्याचा आरोप चोक्सीवर आहे. 2018 ला तो भारतातून पळाला आणि अँटिग्वा गाठलं आहे.
वैद्यकीय उपचारासाठी बेल्जियमला गेल्याचं चोक्सीचं म्हणणं आहे. भारताच्या विनंतीवरून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 2019 साली ईडीनं चोक्सी फरार असल्याचं मुंबई हायकोर्टात सांगितलं होत. तर आजाराचं कारण सांगून चोक्सी जामीन घेऊ शकतो अशी माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. त्याचबरोबर बेल्जीयम सरकार चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मेहुल चोक्सिबद्दल असेल किंवा काहीही असेल माझी सरकारकडे एवढीचं मागणी आहे की, आर्थिक फसवणुकीबाबत कोणतीही फसवणुक होत असेल तर, त्या प्रकरणात जो कोणी आरोपी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण, पहिला तुम्ही टाईम बाऊंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडाले आहेत त्यांचे पैसे पहिला पुर्ण परत करा".
"त्यानंतर आरोपीला शिक्षा करा. पार्लामेंट मध्ये देखील बोलली आहे. कारण त्या आरोपींना जेव्हा लगेच अटक होते. त्यामुळे पैसे बुडालेला गरीब माणूस कष्ट करु लागतो. त्यामुळे मेहुल चोक्सिला पहिलं सांगा आमच्या लोकांनी जे कष्ट करुन पैसे तिथे जमा केले होते, ते त्यांना परत करा. नंतर त्याला जी शिक्षा द्यायची आहे ती द्यावी", अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.