बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारासंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. दौरे सुरु असताना बाप- लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. काहीवेळापुर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये बाप-लेकीची भेट भर उन्हात रस्त्याच झाल्याचे दिसत आहे.
इंद्रापूर येथील दौरा आटपून पुरंदरच्या दिशेने जात असताना सुप्रिया सुळे यांनी रस्त्याच शरद पवार यांनी भेट घेतली. शरद पवार आणि प्रतिभाताई पवार हे बारामतीला जात होते. त्याच वेळेला शरद पवार आणि प्रतिभाताई पवार बसलेल्या गाडीच्या दिशेने गेल्यात. यानंतर सुप्रिया सुळेंनी दोघांना भेट घेतली. शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही सध्या दौऱ्यावर आहेत. हे दौरे सुरु असताना मोरगाव येथे रस्त्यातच पवार कुटुंबातील लेकीची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोघांमध्ये काही क्षण काहीतरी संवाद झाला.