Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं? Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ताज्या बातम्या

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना मंचावर खेचले, ठाकरे कुटुंबीयांची एकता आणि मराठी गौरवाचा संदेश.

Published by : Riddhi Vanne

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : महाराष्ट्राच्या इतिहासात आज मराठी विजयानिमित्त ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमात दोन्ही ठाकरेबंधू मराठी भाषेसाठी लढणार आहेत. या कार्यक्रमानंतर शेवटी ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रितपणे मंचावर येऊन फोटो सेशन केलं, ज्याने उपस्थितांचा विशेष लक्ष वेधलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जे काही केलं ते पाहून सर्वच चकित झाले.

विजयी मेळाव्यानंतर अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी एकत्र मंचावर येत उपस्थितांचे स्वागत केलं. यावेळी अमित आणि आदित्य यांनी एकमेकांना गळाभेट देत एकतेचे संकेत दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आदित्य ठाकरेंचा हात धरून खेचत त्यांना राज ठाकरेंच्या जवळ नेलं, हे दृश्य ठाकरे बंधूयांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी भावनात्मक होतं. या सोहळ्याच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबीयांतून सौहार्दाचा आणि मराठी हितासाठी एकत्र येण्याचा संदेश उमटल्याचं जाणकारांचे मत आहे. राजकीय भूमिकांमध्ये मतभेद असले तरी, सांस्कृतिक आणि अस्मितेच्या प्रश्नांवर ठाकरे कुटुंब एकत्र येऊ शकते, याचे हे ठोस उदाहरण ठरले. कार्यक्रमात मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमान यांचा गौरव करण्यात आला आणि 'मराठी माणूस एकवटला तर काहीही अशक्य नाही' हा संदेश या एकत्रतेतून अधोरेखित झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल