ताज्या बातम्या

ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या...

पुण्यात गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी चार समित्यांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला.

याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मला विश्वासच बसत नाही असा काही रिपोर्ट येऊ शकतो. मी त्या रिपोर्टचा निषेध करते. तो रिपोर्ट जाळून टाका. कुणाच्यातरी घरातली लेक गेली आहे, त्या मुलांची आई गेली आहे, बायको गेली आहे, कुणाची वहिनी गेली आहे."

"सरकारचा रिपोर्ट इतका चुकीचा येऊ शकतो? किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक. आम्ही तो अहवाल मानत नाही. त्याला कचऱ्याच्या डब्यात नाही तर त्याला जाळूनच टाकला पाहिजे. जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही. आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण ती या महाराष्ट्राची लेक आहे. आम्ही माणुसकी विसरलेलो नाही." असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली