महाराष्ट्रात सध्या गाजत असलेले वैष्णवी कस्पटे- हगवणे प्रकरणामुळे संपुर्ण समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या २१ व्या युगात जिथे स्त्री स्वातंत्र्य , स्त्रियांची प्रगती,स्त्रीमुक्ती च्या घोषणा दिल्या जातात स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रोत्सहीत केले जाते अश्या ठिकाणी असा महिलांचा मानसिक शारीरिक छळ आणि हुंडाबळी चा प्रकार होणे हे अतिशय संतापजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता नुसते बसुन किव्हा नुसता संताप करत न राहता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी या कृतीविरोधात हुंडा विरोधी राज्यव्यापी लढ्यात सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केले. 22 जुन 2025 पासून हा लढा चालू केला असुन "हुंडामुक्त आणि हिंसामुक्त महाराष्ट्र" करण्याचे या लढ्याचे उद्धिष्ट आहे. आणि हे करूनच वैष्णवी हगवणे यांना खरी श्रद्धांजली मिळेल असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तीन दशकांपूर्वी 1994 मध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याने महिला धोरण जाहीर'केले होते. त्याद्वारे महाराष्ट्रातील सर्वसमावेशक घटकांचे योग्य'योगदान लाभले आणि त्या द्वारे महिलांच्या जीवनात सामाजिक आर्थिक राजकीय बदल घडलेले आपल्याला पाहायला मिळाले . मात्र हुंड्यासाठी होणारा महिलांचा मानसिक शारीरिक छळ, कौटुंबिक हिंसाचार अजून ही थांबलेला नाही . राजमाता माता जिजाऊ, सावित्रीमाई फुले,अहिल्यादेवी होळकर असे तेजस्वी महिला आपल्या महाराष्ट्राला लाभल्या आणि त्यांनी आपला महाराष्ट्रातील स्त्रियांना अधिक सक्षम बनवून स्त्री पुरुष समानता समाजात निर्माण केली.
असाच बदल समाजात घडवून आणण्यासाठी 22 जुने पासुन राज्यव्यापी लढा सुरु केला असुन या लढ्याचे उद्धिष्ट पूर्ण होई पर्यंत याचा पाठपुरावा करत राहणार असल्याचे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भाऊ बहिणींना हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसाचार मुक्त कुटुंब"सहभागी होण्यासाठी आवाहन यावेळी केले.