ताज्या बातम्या

भाजपसह अजित पवार गटातील नेत्यांवर सुळेंचा निशाणा; म्हणाल्या 'सत्ताधाऱ्यांमागे 'त्या' शक्तींचा हात'

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. इथं दडपशाही चालत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Published by : shweta walge

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. इथं दडपशाही चालत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आज त्या सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

देवेंद्र फडणवीसांचे २.o वास्तवतेपासून दूर आहेत. दौऱ्यात मी सगळीकडे टोल भरते. फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या गाडीला टोल नसेल. देवेंद्र फडणवीस सध्या दु:खी आहेत. त्यांना जास्त त्रास द्यायचा नसतो. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला आहे. भाजपमध्ये ज्यांनी सतरंज्या उचलल्या. ज्यांनी १०५ आमदार निवडून आणले. मात्र त्यांच्या पदरात काहीच नाही पडले. काँग्रेसमुक्त भारत घोषणा देणाऱ्यांना काँग्रेस विचारांचा मुख्यमंत्री हवा आहे, याचा मला आनंद आहे, असं फडणवीसांना टोला लगावत सुळे म्हणाल्या.

भाजपने जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. मात्र ती आता भाजपा नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाली आहे. त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये लोक गेले की सर्व आरोप नष्ट होतात. समरजीत घाडगे यांचे ताजे उदाहरण आहे. माझी घाडगेंनी विनंती आहे त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्यांचे पालकमंत्री आहेत. समरजीत घाडगे आणि भाजपने वाशिंग मशिनमध्ये टाकून पालकमंत्री केले हे स्पष्ट करा. नाहीतर आरोप खोटे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस असे म्हणतात छगन भुजबळ बेलवर आहेत. भुजबळ आज शरद पवार यांच्यावर सतत टीका करत आहेत. मात्र मी त्यांना उत्तर देणार नाही ते माझ्या वयाचे असते तर करारा जवाब दिला असता.

तसेच निवडणूक आयोगाचा पेपर फुटला. पेपर देण्याआधीच यांना निकाल कसा कळला? सत्ताधाऱ्यांमागे दिल्लीतील अदृश्य शक्तींचा हात आहे, असा आरोप देखील सुळेंनी लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा