ताज्या बातम्या

Supriya Sule : ठाकरे बंधूंचं भांडण मिटलं? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राच्या हितासाठी स्वागत

Published by : Prachi Nate

राज ठाकरे यांनी केलेल्या उद्धव ठाकरेंसोबतच्या एकत्र येण्याच्या वक्तव्यावरुन राजकीयवर्तूळात खळबळ माजली आहे. "मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत". राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत.

तसेच यावर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. याचपार्श्वभूमिवर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे बंधूमिलनावर प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राज ठाकरे असं म्हणाले आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातले वाद मोठे आहे. माझ्यासाठी बातमी अतिशय आनंदाची आहे. मी दोघांनाही संपर्क साधला. आमची आणि बाळासाहेब ठाकरे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबासाठी आजही प्रिय आहेत. बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक, इतिहासातला सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील, तर आपण मनाने त्यांच स्वागत केलं पाहिजे. दोनही पवार एकत्र यावे का या प्रश्नावर. पांडुरंगाची इच्छा आहे. नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आजही आणि उद्याही".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?