ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची शरद पवार गटावर सडकून टीका

अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शरद पवार पक्षात होणाऱ्या पक्षप्रवेशावरुन निशाणा साधला आहे.

Published by : shweta walge

अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शरद पवार पक्षात होणाऱ्या पक्षप्रवेशावरुन निशाणा साधला आहे. ज्याप्रकारे पक्ष प्रवेश सुरु आहे, त्यावरून "शरदचंद्र पवार" गटाची ओळख "भाजप गट" म्हणून होईल. अशी टीका त्यांनी केली आहे.

ते म्हणाले की, एकीकडे भाजपला विरोध, तर दुसरीकडे त्यांच्याच लोकांचा पक्षप्रवेश करायचा. उपदेश देणाऱ्यांनी पुरोगामी विचारधारा सोडली का? याला विचारांची गद्दारी म्हणायचं का? संदीप नाईक प्रवेशावरून सुरज चव्हाण यांनी शरदचंद्र पवार गटाला सुनावले आहे.

दरम्यान, भाजपचे बडे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र, भाजपने पहिल्या यादीतच मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा