मराठी बिगबॉस विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली असल्याची माहिती सूरजने दिली. तसच झापूक झुपुक चित्रपट लवकरचं प्रसिद्ध होणार असल्याच त्याने सांगितलं.
यावेळी तो म्हणाला की, "अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..." पुढे बोलताना सूरज म्हणाला की, अजितदादांना माझ्याकडून खूपखूप शुभेच्छा... मी त्यांना भेटण्यासाठी आलो. मलाच भेटायचं होतं दादांना. कधी एकदा दादांची भेट घेतोय असं झालं होतं. माझ्या घराचं काम सध्या सुरू आहे. अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..."