Bigg Boss actor Suraj chavan: बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला अभिनेता सुरज चव्हाण सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या लग्नाची सुंदर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याच्या जवळच्या व्यक्तींनीही ती शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुरजच्या नव्या जीवनप्रवासाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून लग्नाच्या तयारीचे फोटो आणि माहिती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.
सुरज चव्हाणचा विवाहसोहळा 29 नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील जेजुरी–सासवड येथे पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे विधी 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून हळद, मेहंदी आणि संगीत अशा रंगतदार कार्यक्रमांचीही तयारी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने सुरजच्या लग्नाविषयी माहिती दिली होती आणि आता पत्रिका समोर आल्याने सर्वांनी अधिकृतरीत्या कार्यक्रमाची तारीख व ठिकाण पाहिले आहे.
या पत्रिकेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सुरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचा फोटो. अनेक महिन्यांपासून सुरजच्या चाहत्यांना “त्याची बायको कोण?” याची उत्सुकता होती. सुरजने काही दिवसांपूर्वी जरी तिच्यासोबतचे फोटो शेअर केले होते, तरी चेहरा उघड केला नव्हता. आता पत्रिका पाहिल्यानंतर तिचे नाव संजना असल्याचा आणि दोघांचे लव्ह मॅरेज असल्याचा खुलासा झाला आहे. संजना ही सुरजच्या चुलत मामाची मुलगी असून दोघांची ओळख लहानपणापासूनच आहे. ही माहिती अंकिता वालावलकरनेच काही काळापूर्वी सांगितली होती.
व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आधी करिअर मग लग्न — हे खरे करून दाखवलेस”, “अभिनंदन सुरज भाऊ”, “नवीन आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा” अशा कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने शुभेच्छांचा वर्षाव करत सुरज आणि संजनाच्या नव्या प्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या आहेत. सुरज चव्हाणच्या लग्नासंबंधीची ही सगळी चर्चा पाहता त्याचा विवाहसोहळाही चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.