खोक्या भोसले प्रकरणामध्ये विलन ठरवून आपल्या खूनाचा कट रचण्यात आला होता. असा गंभीर आरोप सुरेश धसानी केला आहे. राजस्थानमधून काही लोकांना मुंबईमध्ये आणले. त्यांना सुरेश धस यांच्याकडे हरणाचे मास पुरवले जात असल्याची माहिती देऊन बिष्णोई समाजामध्ये मला विलन केल, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी एका पोर्टलच्या मुलाखतीमध्ये केला आहे. या आरोपामुळे आता मोठी खळबळ उडाली असून याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, "सुरेश धसानी तक्रार दाखल करावी. त्यांचा गृहमंत्र्यावर विश्वास नाही आहे का? खोक्या भोसले आणि सुरेश धस दोघाचे संबध जगजाहीर आहेत. त्यामुळे सुरेश धस कुठेतरी घाबरले आहेत का? सुरेश धसांना चित्रपटांची आवड आहे. त्यामुळे चित्रपटांमधील डॉयलॉग मारुन सीन क्रिएट करणे त्यांना छान वाटते. दरम्यान संतोष देशमुख प्रकरणामध्ये धसांना हिरो बनण्याचे आहे."असे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे