संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस यांनी अनेक आरोप केले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर धस चर्चेत येताना दिसले मुंडेंच्या भेटीनंतर धस आपली भूमिका बदलतात का? असे अनेक प्रश्न धसांसमोर उपस्थित केले जात होते. तसेच त्यांच्यावर विरोधीपक्षाकडून मोठ्याप्रमाणात टीका टिप्पणी केली जात होती. एवढ सगळ झाल्यानंतर आता पहिल्यांदा त्यांनी देशमुख कुंटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत.
महाजन यांच्यावर सहआरोपी म्हणून तत्काळ कारवाई व्हावी
सुरेश धस म्हणाले की, "6 तारखेला घडलेली घटना 9 तारखेपुरती मर्यादीत न ठेवता, एका नावाच्या अधिकाऱ्याला उचलून नेले होते. त्यावेळेचे सीडीआर तपासले गेले पाहिजे. त्यासाठी सायबर सेलचे दोन अधिकारी नेमण्याची विनंती केली आहे. महाजन हे बीडवरून येऊन केज पोलीस ठाण्यातील लॅपटॉपमध्ये काम करतो. त्याचा काय संबंध? तो कसं काय बसतो? असा प्रश्न धसांनी केला. तसेच पुढे धस म्हणाले की, त्यामुळे महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर सहआरोपी म्हणून तत्काळ कारवाई व्हावी".
कृष्णा आंधळे याला शोधून त्याला अटक करणे गरजेचे
"फरार कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करणे गरजेचे आहे. कृष्णा आंधळे हा शातीर आहे, आरोपी तारखेला आल्यावर मोठ बूट घातलेले चित्रविचित्र दिसणारे लोक कसे येतात. ते आरोपींचे मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत. कृष्णा आंधळे यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल असताना पोलीस अधिकारी नित्यनियमाने भेटत होते. 307 च्या फरार आरोपीसोबत पोलीस गप्पा मारत होते. सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, ती प्रक्रियेत आहे. धनंजय देशमुख यांना खासगीमध्ये माहिती दिली आहे. डॉ. संभाजी वायभासे आणि त्यांच्या पत्नी यांनी आरोपींना पैसे पाठवले आहे, यांना सहआरोपी करावे अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली".
सर्व मागण्या मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार
तसेच पुढे धस म्हणाले की, "नितीन बिक्याबद्दल मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो तो महत्त्वाचा आरोपी आहे. नितीन बिक्याबद्दलकड याने धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक घेतली, त्याचसोबत तो तांबोळी आणि शुक्लाला शासकीय निवासस्थानात बैठक घ्यायला गेला होता. हे सगळे आरोपी ज्यावेळी इथून गेले, त्यानंतर वाशीमधून आरोपींना पळून जाण्यात मदत करण्यास नितीन बिक्कडचा वाटा आहे. मग हा आरोपी कसा होत नाही. केसमध्ये आत्तापर्यंत वाल्मिक कराडसह इतर 9 लोक हे 302 मध्ये आले आहेत. 10 वा आरोपी अजून त्यात नाही. त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणात आहे. मी उद्या नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेणार आणि सर्व मागण्या मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार. या मागण्यांची पूर्तता झाली तर 25 तारखेला मस्साजोग करांना आंदोलनाची गरज राहणार नसल्याचे" धस म्हणाले.