करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल आढळून आली आहे, यामुळे त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र ज्यावेळी याबाबतीची तपासणी करण्यात आली त्यावेळी एक महत्त्वाची माहिती समोर आली. याचपार्श्वभूमीवर सुरेस धस यांनी त्यांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे.
यावेळी सुरेश धस म्हणाले की, करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये कोणत्या पोलिस अधिकाऱ्यानी पिस्तुल ठेवलं आहे, आणि त्या साडीमधला तो व्यक्ती कोण? हे जे कटकारस्थान केलेलं आहे... परळी येथे जे हे झालेलं आहे, ते माध्यमांच्या मदतीनेच उघडकीस आलेलं आहे... त्यामध्ये कोणी तरी पोलिस अधिकारी दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत साडीमधला कोणी तरी व्यक्ती दिसत आहे... त्यांच्या गाडीत बंदुक ठेवणारे लोक स्कार्फ बांधून होते ते पोलिस अधिकारी आहेत, आणि ते बीडमधील पोलिस अधिकारी आहेत.. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे.
तसेच सुरेश धस म्हणाले की, त्या पोलिस अधिकाऱ्यांना सस्पेंड कराव, आणि दोषी सापडले तर त्यांना रिमुव्ह फॉर्म सरव्हिस कराव.. यातला एक भास्कर केंद्रे नावाचा पोलिस 15 वर्ष झाली तिथेच आहे, त्याचे स्वतःचे 15 जेसीपी आहेत.. 100 राखेची टिपर आहेत. एवढचं नाही तर तिथला जो मटके वाला आहे त्याच्यासोबत पण पार्टनरशीप आहे... आणि हे जे काय मी बोललो ते खर आहे की, नाही ते तिथे जाऊन तपासा, असं विधान सुरेश धस यांनी केलेलं आहे.