बीडमधील सतीश भोसलेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अस असताना आता सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीनात नवा अडथळा निर्माण झाला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या राहत्या घरातून वनविभागानं प्राण्यांचं वाळलेलं मांस जप्त केलं. एवढचं नाही तर खोक्याचं घर ही वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीरपणे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर वनविभागाने पोलिसांच्या मदतीने खोक्याचं घर जमीनदोस्त केलं आहे.
8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला होता, यादरम्यान त्याच्या घरात काळ्या बाजारात 7 हजार 200 रुपये किंमत असलेला 600 ग्रॅम सुका गांजा आणि प्राण्यांचं वाळलेलं मांसही या कारवाईत जप्त करण्यात आलं आहे. यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी खोक्याचं घर पाडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं म्हणाले आहेत. सुरेश धसांनी खोक्याचं घर पाडण्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुरेश धस म्हणाले की, "खोक्याचे घर पाडायला घाई केली सुरेश धस. मी यासंदर्भामध्ये उद्या जिल्हाधिकारी व तिथल्या प्रशासनाला भेटणार आहे. उद्या शिरूर मध्ये जनता दरबार घेणार आहे त्यामुळे मी याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांना विचारणार आहे. काहीजण म्हणतात की ही जमीन वाटप केली गेली होती. उद्या या संदर्भात मी माहिती घेणार आहे". त्यांच्या या वक्तव्यामुळे ते खोक्याला पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.