ताज्या बातम्या

'आमचा परळी पॅटर्न, इथे रश्मिका आणि प्राजक्ता माळीही येतात... ; सुरेश धस यांचा निशाणा

भाजप आमदार सुरेश धसांनी बीडमध्ये धनंजय मुंडेवर टीका करताना प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना यांचा उल्लेख केला. बीडमधील गोरख धंद्यावर कारवाईची मागणी.

Published by : shweta walge

भाजपचे आमदार सुरेश धसांनी आज पुन्हा खळबळ उडवून दिली. त्यांनी आज बीडचे नवीन पोलिस अधिक्षक नवनीत काँवरा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसच अभिनेत्री प्राजक्ता माळी या आमच्याकडे येतात. प्राजक्ता ताईंचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे, असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले. तसच त्यांनी सपना चौधरी,रश्मिका मंदाना यांचाही उल्लेख केला आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

बीड जिल्ह्यात 'आकां'ची 100 ते 150 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत 30 ते 40 कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. 'आकां'कडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? आमच्या परळीत रश्मिका मंधाना, सपना चौधरी कायम येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले.

बीडमधील 'आका'च्या बगलबच्च्यांनी जिल्ह्यातील तब्बल 1400 एक गायरान जमिनीवर ताबा मिळवला आहे. शिरसाळा गावात गायरान जमिनींवर 600 वीटभट्ट्या आहेत. यापैकी 300 वीटभट्ट्या अनधिकृत आहेत. या वीटभट्ट्या 'आका'च्या कार्यकर्त्यांच्या आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केला. 'आका'चे कार्यकर्ते येथून काही अंतरावर असलेल्या 50 ते 60 एकर जमिनीवरील मुरुम काढून आणतता आणि दुसऱ्या जमिनीवर टाकतात. रसाळ आडनावाचा माणूस हे काम करतो. आकांनी या भागात 50 एकर जमीन घेतली आहे, पूर्ण बोगदा बुजवला आहे. गोरगरीब म्हणतात आमच्या जमिनीतून मुरून नेऊ नका. पण तरीसुद्धा गँग्ज ऑफ वासेपुरने जबरदस्तीने फिलिंग केले आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला.

दरम्यान, बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक