बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहामध्ये मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारागृहात सकाळच्या सुमारास महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनीही वाल्मीक कराडला मारहाण करायला सुरुवात केली, त्याचवेळी त्यांच्यामध्ये वाद आणि मारामारी झाली. यावरुन आता नवं प्रकरण बाहेर येत आहे. बबन गिते याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचपार्श्वभूमीवर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेश धस म्हणाले की, "वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करणार नाही. त्याला फक्त दोन कानशिलात लगावण्यात आल्या आहेत. बापू आंधळे प्रकरणामध्ये महादेव गिते याला अडकवण्यात आले आहे. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते याने यापुर्वी पोस्ट केल्या होत्या की, मला कशा पद्धतीने अडकवले गेले आहे".
सुरेश धस म्हणाले की, "वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करणार नाही. त्याला फक्त दोन कानशिलात लगावण्यात आल्या आहेत. बापू आंधळे प्रकरणामध्ये महादेव गिते याला अडकवण्यात आले आहे. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते याने यापुर्वी पोस्ट केल्या होत्या की, मला कशा पद्धतीने अडकवले गेले आहे".
पुढे सुरेश धस म्हणाले की, "बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकते. आकाला जेवण सुध्दा पाहिजे तसे दिले जाते. त्यांच्याकडे स्पेशल फोन देखील आहे जो परळी येथे कनेक्ट होतो. मागील काही दिवसांपासून बीडच्या तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट झालेल्या आहेत. अक्षय आठवले आणि इतरांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेल्याची चर्चा नाही. फक्त अकाला ट्रीटमेंट मिळते. पोलीस अधीक्षक यांनी यात लक्ष घालायला हवे होते. काही लोक आतमध्ये सुद्धा खून करू शकतात. या कैद्यांना इतर जेलमध्ये हलविणे गरजेचे आहे. यातील काही आरोपी यापूर्वी अमरावती, नागपूर, नाशिक, संभाजीनगर येथे पाठवायला हवे होते".
वाल्मिक कराड मारहाणीवर धसांचा खुलासा
"बीड आणि लातूर जेलमध्ये असे गैरप्रकार सुरू असतात. फोन लावण्यावरून कैद्यामध्ये वाद झाला असावा. मारहाण प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज मी पाहणार आहे. या प्रकरणात मी जेलर मुलानी यांना बोललो आहे. ते याला जबाबदार असतील असं मला वाटत नाही". पुढे वाल्मिक कराडच्या हा चित्रपट निर्माता असल्याच्या माहितीवर सुरेश धस म्हणाले की, "आकाकडे पैसे मोठा आहे, मग निर्माता नाही तर काय होणार. जे लोक आका ने बसवले आहेत. त्यांची चौकशी करायला हवी, मी मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. उद्या मी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार आहे".