Suresh Kalmadi Passed Away Suresh Kalmadi Passed Away
ताज्या बातम्या

Suresh Kalmadi Passed Away : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री (Former Union Minister) सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचे आज, 6 जानेवारी रोजी, पुण्यात निधन झाले.

Published by : Riddhi Vanne

Suresh Kalmadi Passed Away : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री (Former Union Minister) सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचे आज, 6 जानेवारी रोजी, पुण्यात निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन ठेवले जाईल. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील. सुरेश कलमाडी यांचे पुणे राजकारणात मोठे योगदान होते. ते अनेक वर्षे पुण्याचे खासदार होते आणि त्यांचा राजकीय प्रभाव प्रचंड होता. काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळात ते केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते.

तथापि, 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातील भ्रष्टाचार प्रकरणामुळे त्यांच्यावर आरोप झाले होते, ज्यामुळे त्यांचा राजकीय करिअर धक्का बसला. मात्र, 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने क्लोजर रिपोर्ट सादर केल्यावर त्यांना निर्दोष ठरवले होते. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रातही योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात मोठी शोकसंचार झाली आहे.

सुरेश कलमाडी हे भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक होते, आणि त्यानंतर राजकारणात आपला ठसा सोडला. अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या कलमाडी यांना काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भेट दिली होती, कारण त्यांची तब्येत खालावली होती. आज त्यांचे निधन झाले असले तरी, पुण्याच्या राजकारणात त्यांचा ठसा कायम राहील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा