बीडच्या आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाची पाहणी तसेच शिंपोरा ते खुंटेफळ पाईप लाईन बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट जनतेतील कार्यक्रमाचा मान आष्टीला मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आष्टीतील नागरिक मोठ्या संख्येने खुंटेफळकडे गेल्याने आष्टी शहर बंद ठेवण्यात आले, प्रकल्पामुळे 28 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. यावेळी पंकजा मुंडे देखील उपस्थित राहिल्या आहेत.
याचपार्श्वभूमिवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, देवेंद्रजी तुम्हाला जेव्हा सीएम म्हणून हे सगळे लोक बाहुबली म्हणतात.. खरं तर तुम्ही आमच्या पेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात, आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो.. त्या कॅबिनेटचे तुम्ही प्रमुख आहात.... तुमच्या विषयी आदरभाव हा नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतो आहे... कारण, ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामी म्हणत होते....कारण, शिवगामी ही बाहुबलीची आई आहे...
त्यामुळे तुम्हाला बघताना मला आज वेगळाच भाव आला.... शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस तुम्ही जसे पिक्चर म्हणता, आम्हीही पिक्चरचे वाक्य म्हणतो.... शिवगामीणीचं वाक्य असतं, मेरा वचनही है मेरा शासन, आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिल आहे तेच माझं शासन आहे.... मी गोपिनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही... , असे पंकजा मुंडे म्हणाल्या.