ताज्या बातम्या

Lokshahi Pune Sanwad 2025 : ' "पुण्याची सांस्कृतिक ओळख गमावली" पुण्याच्या ओळखीवर Sushma Andhare यांच वक्तव्य

"पुण्याची सांस्कृतिक ओळख गमावली" पुण्याच्या ओळखीवर सुषमा अंधारेंच वक्तव्य

Published by : Prachi Nate

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पुणे संवाद 2025' या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा झाली. या कार्यक्रमात सुषमा अंधारे सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, "पहिला पुणे हे चांगल्या साहितीकांसाठी ओळखलं जायचं. फडक्यांपासून ते खूप चांगली लोक पुण्यातून मिळाली आहेत. इथे खूप लेखक घडले त्याचसोबत कलाकार घडले तसेच रंगभूमीचे खूप अभिनेते घडले आहेत. एवढचं नव्हे तर इथे चित्रकार देखील पाहायला मिळाले आहेत. मुंबईत जो कलाकार कट्टा पाहायला मिळणार नाही तो पुण्यात आहे".

"पुणे हे कष्टकऱ्यांच आहे, पुणे हे श्रमीकांचे शहर आहे. पुणे तसं खूप सुंदर आहे, कधी काळी संस्कृतीचं माहेरघर असणारे पुणे आता कोयता गॅंग, ड्रग्सचे प्रकरण, वाहतूक कोंडी, न्यायव्यवस्थेचा प्रश्न अशा नावांनी ओळखलं जात, तेव्हा निश्चितच माझ्यासारख्या पुण्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला वाईट वाटतं राहतं की, आपलं पुणे असं नाही".

"पुण्यामध्ये शिकायला येणं म्हणजे आमच्यासाठी स्वप्न असायचं. आता जेव्हा मी पुण्यात राहते आहे आणि माझी मुलगी पुण्यात शिकते आहे. त्यावेळेस दुसरे मला असं सांगतात की, तु दुसरी कोणती तरी शाळा का बघत नाही? तेव्हा वाईट वाटत. संपुर्ण राज्यातून आणि राज्याच्या बाहेरुन शिक्षण घेण्यासाठी लोक ज्या पुण्यात यायची. आता पुण्याच्या ऐवजी दुसरीकडे मुलं पाठवाव, असं का वाटत? पुण्यात असे किती तरी नेते आहेत ज्यांची मुलं आज पुण्यात शिकत नाहीत. मी हे उच्च शिक्षणाचं सांगत नाही. मी हे शालेय शिक्षणाबद्दल सांगते आहे. मला असं वाटत की, परिस्थिती खरचं खूप गंभीर आहे, याच्यावर राज्याच्या मंत्र्यांनी खरचं विचार केला पाहिजे असं देखील मला वाटत".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य