ताज्या बातम्या

उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंनी शेअर केले अमृता फडणवीस, केतकी चितळे अन् कंगनाचे फोटो, म्हणाल्या...

Published by : Siddhi Naringrekar

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावेळेस भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. आज थेट त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेत पत्र दिले आहे. उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे. याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे. या एकूण वादात आता उर्फी जावेदने शिवीगाळ करत प्रत्युत्तर दिलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी घेतली आहे. सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीस, केतकी चितळे अन् कंगनाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट' तसेच 'पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. असे त्या म्हणाले.

यासोबतच त्यांनी पुढे लिहिले की, 'अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.' असे त्यांनी म्हटले आहे.

Rajendra Gavit : शिंदे गटाला धक्का! राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट