Admin
ताज्या बातम्या

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर सुषमा अंधारे ठोकणार अब्रू नुकसानीचा दावा

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटावर हल्लाबोल करत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटावर हल्लाबोल करत असतात. यादरम्यान सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. परंतु, याचवरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभ घसरली. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत, असे विधान त्यांनी केले होते.

याचपार्श्वभूमीवर आता राज्यभरात स्थानिक पोलीस स्टेशनला उद्धव ठाकरे गटाकडून शिरसाठ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जात आहे, मात्र पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंनी आता राज्य महिला आयोगाला पत्र लिहून शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे. सुषमा अंधारे आक्रमक झाल्या असून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका अंधारे यांनी घेतली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार