थोडक्यात
महिला डॉक्टरने चेकइन केलेलं ते हॉटेल कोणाचं?
मालकाचे आहे बड्या नेत्याशी खास कनेक्शन?
सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत महिला डॉक्टरने आत्महत्या केलेले हॉटेल कोणाचे आहे? याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी त्या हॉटेल मालकाचे एक आमदाराशी कनेक्शन असल्याचे देखील अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
महिला डॉक्टर संपदा मुंडे प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर राहत होती. एक दिवस अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच घरमालक प्रशांत आणि डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाला. ऐनवेळी रहायला कुठे जायचे म्हणून महिला डॉक्टरने मधूदीप हॉटेलमधील खोली दोन दिवसांसाठी बूक केली. हॉटेलमध्ये जाताना तरुणीसोबत कोणीही नव्हते. हॉटेलची खोली दोन दिवस न उघडल्यामुळे हॉटेल मालकाने शनिवारी संध्याकाळी ४ वाजता खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा तरुणीचा मृतदेह आढळला. तसेच हातावर लिहिलेली सुसाईट नोट देखील दिसली. आता सुषमा अंधारे यांनी हे हॉटेल कुणाचे आहे याबाबत खुलासा केला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैशली हगणवे प्रकरणात सुद्धा कॅरेक्टर बदनाम केले. आता सुद्धा या डॉक्टरचे कॅरेक्टर बदनाम केले. संपदा मुंडे हॉटेलमध्ये गेली कशी? रात्री एखाद्या महिलेला हॉटेल कसे मिळते? ती रात्री का गेले हॉटेलमध्ये? हे हॉटेल भोसले यांचे आहे. हा नगरअध्यक्ष पदाचा दावेदार आहे. जयकुमार गोऱ्हे बाजूला आहे यांच्यावर सुद्धा आरोप केले.
संपदाची बहिण सांगते हे अक्षर तिचे नाही. संपदा हीने आत्मत्या केली का हत्या झाली? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. काल फलटण मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथ गेले आणि रणजित निंबाळकर यांना क्लीन चीट दिली ते आम्हाला कळलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अशा कित्येक जणांना क्लिनचीट दिली आहे. संपदाने लिहलेले हातावरील सुसाईड नोट ही तिचे हस्ताक्षर नाही असे सुषमा अंधारे म्हणाल्या.