ताज्या बातम्या

Sushma Andhare On Satara Doctor Case : हातावरील हस्ताक्षर आणि पत्रातील हस्ताक्षरात फरक..., अंधारेंच्या खुलास्याने फलटण प्रकरणाला नवीन ट्विस्ट

फलटणमध्ये एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर सुषमा अंधारेंनी पत्रकारांशी बोलताना एक मोठा खुलासा केला आहे.

Published by : Prachi Nate

फलटणमध्ये एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही डॉक्टर फलटणमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

बदने याने अत्याचार केला, तर बनकर याच्याकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचे तिने नमूद केले. हे प्रकरण आता राजकीयवर्तूळात देखील खळबळ माजवत आहेत. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे अ‍ॅक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी प्रकरणाच्या काही दिवसांतच पत्रकार परिषद घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आज देखील पत्रकारांशी बोलताना या प्रकराणीत एक मोठा खुलासा केला आहे.

संपदाच्या हातावरील हस्ताक्षर आणि पत्रातील हस्ताक्षरात फरक असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. तसेच यामुळे संपदाची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. तिची खरच हत्या झाली का? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थिती केला, यामुळे आता सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा