ताज्या बातम्या

Lokshahi Pune Sanwad 2025 : "Nilesh Rane गुंडाच्या हत्येनंतर त्याच्या घरी जातात पण..." Sushma Andhare म्हणाल्या,

निलेश राणे गुंडाच्या घरी जातात, पण शहीद जवानांकडे नाही. पुण्यातील राजकीय चर्चेवर सुषमा अंधारेंच वक्तव्य

Published by : Prachi Nate

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पुणे संवाद 2025' या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा झाली. या कार्यक्रमात सुषमा अंधारे सहभागी झाले होते.

त्यावेळी सुषमा अंधारे म्हणाले की, "पुण्यात आलेला कष्टकरी श्रमीक हा इथे कष्ट करण्यासाठी आलेला आहे तो इथे गुंडागर्दी करण्यासाठी आलेला नाही. पण, त्यांच्यावर जे गुंडागर्दी करणारे आहेत त्यांच्यावर वरदहस्त कोणाचा आहे. तो वरदहस्त म्हणजे आकांचे आका आणि त्या आकांचे सरताज. पुण्यात देखील असे आका असणार त्याच्याशिवाय हे सगळ शक्य होत का?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या की, "आता हा जो हल्ला झाला त्या हल्ल्यात पुण्यातले देखील काही लोक होते. त्यात पुण्यात आता कालपर्वा दोन घरात पार्थिव देखील पोहचले आणि त्यावेळी माझ्या पक्षातील प्रतिनिधी सचिन भाऊ वैगरे हल्ल्यात गेलेल्या त्या दोन व्यक्तींच्या घरी भेटून आले. मला आता याविषयावर अजिबात राजकारण वगरे काही आणायची इच्छा नाही. पण त्याच ठिकाणी एका गुंडाची हत्या होते आणि त्या गुंडाच्या हत्येनंतर निलेश राणे त्या गुंडाच्या घरी भेटायला जातात".

"त्याचठिकाणी इथे पुण्यामध्ये तीन ते चार देशासाठी लढणारे जवान शहीद झाले. त्यांचे पार्थिव आले ते सोडा आता कालच्या हल्ल्यात दोघे जण गेले. नितेश राणे तिथे भेटायला गेले नाही. तुम्हाला लोकांना काय संदेश द्यायचा आहे? काय सांगायचं आहे तुम्हाला लोकांना? गुंडाची हत्या होते त्याच्या घरी तुम्ही भेटायला जाता पण देशासाठी जो शहीद झाला त्याला भेटायला तुम्ही जात नाही".

"तुम्ही तिथे हिंदू-मुस्लिम करताय. याच पुण्यात आमच्या पक्षाचे एक जावेद भाई आहेत जे त्यांच रोजे आणि रमजानचा महिना सोडून एका ब्राम्हण कुटुंबाच्या घरी अंत्यसंस्कार करायला पुढे सरसावतो. त्याच्या डोक्यात काही येत नाही हे आमचं पुणे आहे. पण या पुण्यात अशी विशारी भाषा करणारे लोक येतात त्याचं आम्हाला वाईट वाटत", असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा