थोडक्यात
ऊस दराच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' आक्रमक
उसाला पहिला हप्ता 3100 रूपये द्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
ऊस दराच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऊस दर जाहीर करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.
ऊसाला 3100 रूपये पहीला हप्ता द्या नाहीतर यंदाचा गळीत हंगामात जाणारा ऊस रोखण्याचा तसेच दर जाहीर करा अन्यथा ऊस वाहतूक बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.
येत्या आठ दिवसात कारखानदारांनी निर्णय घ्यावा नाहीतर आंदोलन उभारले जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माऊली मुळे यांनी दिली आहे.