raju Shetti  
ताज्या बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज राज्यभर आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे.

थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी करण्याचं सत्र राज्य सरकारनं चालवलं आहे. हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे.

 सकाळी 11 वाजता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. तसेच बुलढाण्यातही सकाळी 11 वाजता मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट-बकाल इथं रास्ता रोको आंदोलन होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monika Bhadoriya : 'तारक मेहता' फेम 'या' अभिनेत्रींच्या शरीरयष्टीवरुन निर्मात्याचे आक्षेपार्ह विधान, मानसिकदृष्टया खचल्याने तिचा जीवन संपवण्याचा विचार

Maharashtra Top In Digital Payment : UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Gatari 2025 Special Non- veg Recipe: गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार

Akkalkot : छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते आक्रमक; अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं