ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी केली तिकीट दरात भरमसाठ वाढ

शनिवारी रात्री मुंबई ते कोल्हापूर एसी स्लीपर ट्रव्हल्सकरिता दोन ते अडीच हजार रुपये तिकीट आकारण्यात आले.

Published by : Sagar Pradhan

निसार शेख|रत्नागिरी : ज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोल्हापूर, रायगड,बीड, सांगली, सिधुदुर्ग, नाशिक, अमरावती, सोलापूर, अहमदनगर, अकोला, वाशिम, धुळे,वर्धा, बुलढाणा,रत्नागिरी या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा घुरळा रविवारी उडणार आहे.

त्यामध्ये आपला सहभाग दर्शविण्यासाठी, आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी मुंबईकर गावाकडे रवाना झाले आहेत.प्रवाशांची गर्दी पाहता ट्रव्हल वाहतुकदारांनी देखील तिकीट दरात भरमसाठ वाढ केली आहे. शनिवारी रात्री मुंबई ते कोल्हापूर एसी स्लीपर ट्रव्हल्सकरिता दोन ते अडीच हजार रुपये तिकीट आकारण्यात आले. तर नॉन एसी ट्रव्हल्स करिता १३०० ते १५०० रुपये तिकीट दर होता. हीच परिस्थिती सांगली,रत्नागिरी,बीड,सिधुदुर्ग,सोलापूर,अमरावती, अहमदनगरकरिता होती.

मुंबई ते कोल्हापूर- २ हजार ते २५०० रु, मुंबई ते रत्नागिरी १४००ते १६०० रु, मुंबई ते बीड १९०० ते २१००रु, मुंबई ते सिधुदुर्ग १४०० ते १६००रु, मुंबई ते अमरावती ३ हजार ते ३२००रु, मुंबई ते अहमदनगर ८०० ते १ हजार रु, मुंबई ते वाशीम १ हजार रु , मुंबई ते सोलापूर १५०० ते २ हजार रु असे भरमसाठ दर आकारले जात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते