ताज्या बातम्या

Sushma Andhare : तटकरेंनी रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा..सुषमा अंधारेंची मागणी

फलटण महिला डॉक्टर प्रकरणाबाबत दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत पोलीसांवर गंभीर आरोप केला आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • महिला आयोगाविरोवर महिला असूनही न्याय मिळत नाही...

  • तटकरेंनी रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा..सुषमा अंधारेंची मागणी

फलटण महिला डॉक्टर प्रकरणाबाबत दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत पोलीसांवर गंभीर आरोप केला आहे. तसेच महिला आयोगालाही सवाल केले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत सीडीआरवर भाष्य केले होते. यावरून आता अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाल्या अंधारे?

सुषमा अंधारे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटले की, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या वस्तू जप्त केल्या जातात. लॅपटॉप, फोन आणि इतर गोष्टी सील केल्या जातात आणि त्याची माहिती गोपनीय ठेवली जाते. या वस्तू न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयासमोर उघडायच्या असतात. आम्ही रणजितसिंह निंबाळकर यांच्या महाडिक यांच्यात काही संवाद झाला का? महाडिक आणि धुमाळ यांच्यात संवाद झाला आहे का? याची सीडीआरची मागणी करत आहोत, मात्र याबाबत कोणतीही माहिती पुढे येत नाहीये.

पोलीसांवर गंभीर आरोप

काल निंबाळकर यांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या. त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितले नाही. पण मुलीच्या सीडीआरबद्दल बोलल्या. आता मला पोलीसांना प्रश्न विचारायचा आहे की. पोलीसांना त्या मुलीचा मोबाईल आणि तिचं सीडीआर लीक करण्याचा अधिकार कोणी दिला? हे सीडीआर महिला आयोगाला दिले असं आपण गृहित धरू. मग त्यांनी कोणत्या अधिकाराच्या खाली त्याबद्दल भाष्य केले? त्यांना तो अधिकार आहे का? त्यांना तो अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा व्यक्तीला पदावर ठेवायचा की नाही हा विचार करावा. राष्ट्रीय महिला आयोगाने चाकणकरांकडून तातडीने स्पष्टीकरण मागावे अशी मागणी केली आहे.

चाकणकरांचा राजीनामा घ्यावा

पुढे बोलताना अंधारेंनी म्हटले की, ‘सुनील तटकरे यांनी चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. मुख्यमंत्री यांनी या राजीनान्याची प्रक्रिया तातडीने राबवावी. ती का केली पाहिजे याचं कारण म्हणजे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये तरुणांकडून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे तातडीने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा.’

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा