Kurla Bus Accident Rikshaw Crashed 
ताज्या बातम्या

Kurla Bus Accident: 'त्या' रिक्षाचालकासाठी चहा खऱ्या अर्थाने 'अमृततुल्य' ठरला!

कुर्ला बस अपघातातून रिक्षाचालकाचा थरारक बचाव! चहा पिण्याच्या निर्णयामुळे वाचला जीव. नेमक काय घडलं हे जाणून घेऊया.

Published by : Gayatri Pisekar

मुंबईतील कुर्ला येथे घडलेली घटना भीषण होती. ब्रेक फेल भरधाव बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातामध्ये एका रिक्षावाल्याचा जीव थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.

चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच असं आपण म्हणतो. चहाचं नाव काढलं तर चहा प्यावाच असंही म्हटलं जातं. या चहामुळेच एका रिक्षाचालकाचा जीव थोडक्यात बचावला आहे.

नेमकं काय घडलं?

रिक्षा चालक भाडं घेऊन कुर्ल्यात आला होता. भाडं सोडल्यानंतर त्याला चहाची तलप आली. म्हणून तो चहा प्यायला रिक्षातून खाली उतरला. त्याच्या जेव्हा ते रिक्षातून खाली उतरला तेव्हा त्याच्या ध्यानीमनीही आलं नसेल. अशी भयंकर घटना तेथे घडली होती.

रिक्षा चालक रिक्षातून उतरुन चहाला जाणार इतक्यात भरधाव वेगाने बेस्ट बसने त्याच्या रिक्षाला चिरडलं आणि फरफटत नेलं. या घटनेमध्ये रिक्षा चालक अगदी थोडक्यात बचावला.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती...

अनिल शाह असं या रिक्षाचालकाचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. रिक्षातून उतरताच मागून भरधाव बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. मृत्यू अगदी जवळून त्याने पाहिला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा प्रकार या रिक्षा चालकासोबत घडला.

अवघ्या एका सेकंदामुळे रिक्षावाल्याचा जीव वाचला. ३२ वर्षीय अनिल कुमार शहा यांच्या रिक्षाचा अक्षरश: चुरा झाला आहे. इतकी ही घटना भयंकर होती. रिक्षाची अवस्था पाहून कुणालाही प्रश्न पडेल की जर या रिक्षामध्ये कुणीही असतं, तर त्यातला कुणी वाचलं असतं का? मात्र, म्हणतात ना दैव नशीब बलवत्तर असल्याने या रिक्षातील प्रवासी कुर्ला स्टेशनवर उतरले होते. रिक्षा चालकाला नेमकी चहाची तलप आल्याने तो रिक्षातून उतरला होता. रिक्षाचालकासाठी तो चहा खऱ्या अर्थाने 'अमृततुल्य' ठरला!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य