कोल्हापूरमधील चहावाला चक्क राजकीय नेते, कलाकार मंडळी यांच्या आवाजात चहाची विक्री करत आहे. कोल्हापुरातील खासबाग हॉटेल परिसरात असलेल्या शाहू मैदानाजवळील चहाचं दुकान असलेला हा अवलिया चहाविक्रीसोबतच ग्राहकांच मनोरंजनही करत आहे. किशोर साळोखे असं या चहाविक्रेत्याचं नाव असून मराठीतील ज्येष्ठ कलावंत निळू फुले, दादा कोंडके, मकरंद अनासपुरे यांच्या आवाजात त्यांच्याच चित्रपटातील संवाद बोलून आपल्या चहाची जाहिरात करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गवती चहा स्पेशालिस्ट असं त्याच्या चहाच्या दुकानाच नाव आहे. कलाकारांची मिश्किल मिमिक्री आणि चेहऱ्यावर हास्य पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत आहे.