टीम इंडियाचा स्टार खेळाडू नितीश रेड्डी हा दुखापतीमुळे सध्या सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यातून माघारी फिरला होता. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात नितीश रेड्डीला खेळण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे इंग्लंड विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात बाहेर पडला.
यानंतर आता नितीश रेड्डी मोठ्या अडचणीत आला आहे. बंगळुरूस्थित टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी स्क्वेअर द वनने त्याच्यावर नितीश वर 5 कोटींपेक्षा जास्त थकबाकी न भरल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आता सोमवारी 28 जुलैला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
नितीश रेड्डी आणि स्क्वेअर द वन एजन्सी यांच्यात 3 वर्षांचा करार झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर स्क्वेअर द वन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीचे संचालक शिव धवन यांनी असा दावा केली की, नितीश रेड्डीने करार तोडला आणि थकबाकी देखील भरले नाही. तसेच स्क्वेअर द वन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीने हे प्रकरण आता कोर्टात नेले आणि नितीश रेड्डीविरोधात याचिका दाखल केली आहे.
याचपार्शवभूमीवर क्रिकेटर नितीश रेड्डी म्हणाला की, " मी न्यायालयात जाण्यास तयार आहे. पण मी एजन्सीली कोणतेही पैसे देणार नाही, कराण मी स्वतःच एंडोर्समेंट डील मिळवली होती. यात स्क्वेअर द वन एजन्सीचा सहभाग नव्हता. त्यामुळे आता याबाबतीत कोर्ट काय भूमिका घेत हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.