ताज्या बातम्या

PF : एक 'Miss call’ आणि PF Balance काही क्षणांत मोबाईलवर ! जाणून घ्या सोपी पद्धत

EPF सेवा: मिस्ड कॉलद्वारे PF बॅलन्स मिळवा, सोपी डिजिटल पद्धत.

Published by : Team Lokshahi

पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली आहे? नवे योगदान किती? क्लेम स्टेटस काय आहे? यासाठी आता ना कुठे जायला लागणार, ना फॉर्म भरायला लागणार! फक्त मोबाईल हातात घ्या आणि एका मिस्ड कॉलनं मिळवा संपूर्ण माहिती, तेही EPF खात्याचा बॅलन्स तपासणं कधी नव्हे इतकं सोपं!

आपल्या भविष्यासाठी दर महिन्याला पगारातून कपात होणाऱ्या प्रॉव्हिडंट फंड (EPF) खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, हे अनेकांना माहितच नसतं. काहीजण तर बॅलन्स तपासण्यासाठी वर्षातून एकदाच पासबुक उघडतात. पण आता हे सगळं बदललं आहे, कारण EPFO (Employees’ Provident Fund Organisation) ने घरबसल्या EPF माहिती मिळवण्यासाठी अनेक सोप्या आणि डिजिटल सुविधा सुरू केल्या फक्त ‘मिस्ड कॉल’ देऊन मिळवा तुमचा पीएफ बॅलन्स!

हो, तुम्ही बरोबर वाचत आहात! आता फक्त ९९६६०४४४२५ या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून मिस्ड कॉल दिला, की काही क्षणांतच EPFOकडून तुमच्या पीएफ बॅलन्सचा मेसेज येईल.

अट : तुमचा मोबाइल नंबर तुमच्या UAN (Universal Account Number) सोबत नोंदलेला असावा.

हा मेसेज तुम्हाला तुमच्या खात्यातील एकूण जमा रक्कम, नवे योगदान, आणि नोकरीतून बदल झाल्यास जुने पीएफ आयडी इत्यादी माहिती देतो.

एसएमएस पाठवून सुद्धा मिळवा पीएफ माहिती

जर तुम्हाला मिस्ड कॉल देणं शक्य नसेल, तर एसएमएसद्वारेही EPF बॅलन्स मिळवता येतो.तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस पाठवा:EPFOHO ENG

ENG म्हणजे इंग्रजी भाषेतील माहिती.इतर भाषांमध्ये माहिती हवी असल्यास, म्हणजे 'HIN' (हिंदी), 'MAR' (मराठी), 'TAM' (तामिळ) अशी त्या भाषेची पहिली तीन अक्षरे वापरा.

UMANG अ‍ॅपद्वारे मिळवा सर्व EPF सेवा

UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) हे भारत सरकारचं अधिकृत अ‍ॅप असून, यामध्ये EPF संबंधित सगळ्या सेवा मिळतात:

पीएफ बॅलन्स तपासणे

पीएफ पासबुक डाउनलोड करणे

क्लेम स्टेटस तपासणे

क्लेम सबमिट करणे

ट्रान्सफर रेकॉर्ड पाहणे

फक्त एकदाच UAN नोंदवून लॉगिन करा आणि सहजपणे सगळ्या सेवा वापरा.

काही महत्त्वाच्या सूचना :

मोबाईल नंबर UAN सोबत लिंक असावा.

UAN activate केलेलं असावं.

मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन नसले तरी मिस्ड कॉल आणि एसएमएस सेवा कार्यरत राहतात.

संपूर्ण EPF माहिती, एक फोनवर – तेही मोफत!

आजच्या डिजिटल युगात सरकारकडून अनेक सेवा 'मोबाईलवर एका क्लिकमध्ये' उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यात EPFO चे हे पाऊल लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. तुम्हालाही तुमच्या भविष्य निधी खात्याची माहिती पाहायची असेल, तर आता कुठेही जाऊ नका फक्त मिस्ड कॉल द्या किंवा एक मेसेज पाठवा!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच