Ahmed Patel and Teesta Setalvad Team Lokshahi
ताज्या बातम्या

Teesta Setalvad ने सोनिया गांधींच्या सचिवांकडून सरकार अस्थिर करण्यासाठी घेतले 30 लाख - SIT

गुजरातचे DGP राहिलेले आरबी श्रीकुमार आणि माजी IPS अधिकारी संजीव भट्ट या कटात सहभागी होते.

Published by : Team Lokshahi

Teesta Setalvad : गुजरातमध्ये झालेल्या दंगली प्रकरणात नवा खुलाशा समोर आला आहे. काँग्रेसचे दिवगंत नेते व सोनिया गांधींचे सचिव अहमद पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी मिळून राज्यातील भाजप सरकारविरोधात कट आखला असल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने (SIT) केला आहे. त्यासाठी तिस्ताला 30 लाख रुपये पटेल यांनी तिस्ता यांना दिले होते. गुजरातचे DGP राहिलेले आरबी श्रीकुमार आणि माजी IPS अधिकारी संजीव भट्ट या कटात सहभागी होते. त्यांनी गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार अस्थिर करण्यासाठी कट रचला होता.

गुजरात पोलिसांनी न्यायालयात तिस्ता सेटलवाड आणि माजी आयपीएस अधिकारी आर.बी. श्रीकुमार यांच्या जामीन अर्जाला विरोध करतांना धक्कादायक युक्तीवाद केला आहे. पोलिसांनी दोन साक्षीदारांचा हवाला देत प्रतित्रापत्र दाखल केले आहे. गुजरातची प्रतिमा डागाळण्याचा कट अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावर रचण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यासाठी पटेल यांनी दोन वेळा तिस्ता सेटलवाड यांना पैसे दिले. पहिल्यांदा 5 लाख रुपये तर दुसऱ्यांदा 25 लाख रुपये देण्यात आले. हे पैसे गुजरात मदत कार्याच्या नावाने घेण्यात आला होता. गुजरातमध्ये गोध्रा येथील रेल्वेजळीत कांड घडल्यानंतर सेटलवाड यांनी एका आठवड्यात मदत शिबिराचा दौरा केला आणि राजकीय नेत्यांसोबत बैठका घेतल्या. हा कट रचण्यासाठी दंगलीच्या चार महिन्यानंतर गुप्त पद्धतीने त्यांनी तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्टसोबत अहमद पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

राज्यसभा खासदार होण्याची महत्त्वकांक्षा

केंद्र सरकारने 2007 मध्ये तिस्ता सेटलवाड यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. तिस्ता यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी होती. तिला खासदार होण्याची इच्छा होती. गुजरात राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या राजकीय हेतू पुरावा देण्यासाठी एसआयटीने 2006 मध्ये पंचमहलमधील पंडारवाडामध्ये दंगल पीडितांचे मृतदेहचे उदाहरण दिले. हे मृतदेह आढळल्यानंतर सेटलवाड यांनी दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. या घटनेच्या वेळी सेटलवाड यांनी गुजरात सरकार तीन दिवसात राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते.

काय आहे आरोप

तिस्ता सेटलवाड यांनी दंगल पीडितांसाठी जमवण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग केला आहे. तिस्ताने 'सिटीजन फॉर जस्टिस अॅण्ड पीस' (CJP) संस्थेच्या आयडीबीआयमधील बँक खात्यात 63 लाख रुपये आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या सबरंग ट्रस्टच्या खात्यात 88 लाख रुपये जमा करण्यात आले होते. या निधीत मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.

अहमद पटेलची मुलगी म्हणाली...

दरम्यान, या प्रकरणात अहमद पटेल यांची मुलगी मुमताज खुलाशा करण्यासाठी पुढे आली. गुजरातमध्ये निवडणुका होणार आहे. या प्रकरणात 20 वर्ष झाली आहे. माझे वडील आता जिवंत नाही. परंतु मागील दीड वर्षापासून माझ्या वडिलांना बदनाम केले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया