ताज्या बातम्या

पक्षातील बंडखोरीनंतर तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार? शिवसेनेचा बडा नेता म्हणतो...

Published by : Team Lokshahi

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत. बंडखोरीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेला उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच चर्चेवर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेजस ठाकरे राजकारण आले तर यात काही नवीन असल्याचे वाटून घेण्याची गरज नाही, असे दानवे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमातही ते दिसत नाहीत. मात्र शिवसेनेतील बंडखोरीनंतर तेजस ठाकरे कोल्हापुरात एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. कोल्हापूर दौरा संपल्यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आता तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे म्हटले जात आहे. तशी चर्चा सुरू आहे. याच चर्चेवर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार की नाही याचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील. तसेच तेजस ठाकरे राजकारणात आले तर त्यात नवे वाटून घेण्याची गरज नाही, असे सूचक विधान केले.

Yavatmal : यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या

Navi Mumbai : नवी मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई

Monsoon News : केरळमध्ये 31 मे ला मान्सून दाखल होणार,हवामान विभागाचा अंदाज

Amit Shah On Kejriwal : 'केजरीवालांना जामिनाबाबत विशेष वागणूक' अमित शाहांचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले...