ताज्या बातम्या

'ईडी, सीबीआय, आयटीनं कधीही यावं, माझ्या घरात कार्यालय उघडावं, त्यांचं स्वागतच' : तेजस्वी यादव

Published by : Siddhi Naringrekar

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची घेतल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सध्या राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरुनसुध्दा त्यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, पाटणा येथील माझ्या निवासस्थानी या यंत्रणांनी त्यांच्या विभागाचे कार्यालय उघडून त्यांना हवी ती चौकशी करावी, याला आमचा कोणताही आक्षेप नसेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

जनतेला सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. औषध, जलसिंचन, शिक्षण, रोजगार यावर सुनावणी आणि कार्यवाही हा सरकारचा अजेंडा असेल. बिहार विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला की, आम्ही बिहारमधील प्रत्येक हाताला नोकऱ्या देऊ, असं त्यांनी सांगितले,

यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री असताना 18 महिन्यांच्या कार्यकाळात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. आमच्याकडे RJD कोट्यातील 18 मंत्री आहेत आणि त्यांच्यापैकी कोणीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले नाही, असंही ते म्हणाले. भाजपकडून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या यंत्रणा त्यांच्या विरोधात असलेल्या नेत्याला घाबरवण्यासाठी वापरल्या जात आहेत. जर कुणी खरंच भ्रष्टाचार करत असेल तर या यंत्रणांनी खुशाल चौकशी करावी.

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"