Tejaswini Pandit emotional post : "तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन...." आईच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीची भावूक पोस्ट Tejaswini Pandit emotional post : "तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन...." आईच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीची भावूक पोस्ट
ताज्या बातम्या

Tejaswini Pandit emotional post : "तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन...." आईच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीची भावूक पोस्ट

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी अखेर श्वास घेतला. अभिनेत्री तेजस्वीनी या घटनेतून पुर्णपणे सावरली नाही आहे. नुकतीच तेजस्वीनीने आईच्या वाढदिवसांची दिवशी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Published by : Riddhi Vanne

Tejaswini Pandit emotional post : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी अखेर श्वास घेतला. अभिनेत्री तेजस्वीनी या घटनेतून पुर्णपणे सावरली नाही आहे. नुकतीच तेजस्वीनीने आईच्या वाढदिवसांची दिवशी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तीने आईसोबत घालवले क्षण तसचे आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

काय लिहिलं आहे तेजस्वीनीने पोस्टमध्ये?

आई

काय बोलू…….

अजून sink in होत नाहीये गं तू नाहीस.

आपली International Girls Trip राहिली, कथा चा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण, आपल्या फार्म वर new year celebrate करायचा होता.

तुझ्यावरचं पुस्तक प्रकाशन आज तुझ्या वाढदिवसाला करायचं होतं आपल्याला, त्याचं किती काम बाकी राहून गेलं….

आई तू ना प्रचंड हट्टी होतीस . किती वर्ष तुला सांगते होते आधी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष दे. पण काम सोडून काहीच सुचलं नाही तुला. मला नेहमी म्हणायचीस काम करता करता मरण यावं. कित्येकदा तुला सांगितलं तुझ्या मुली खमक्या आहेत. तू आता फक्त तुझ्या आनंदासाठी काम कर. तुझ्या terms वर. पण कामाप्रती तुझी श्रद्धा काही औरच होती. आणि बरोबरच आहे, कामात स्वतःचा आनंद असणारी,मानणारी माणसं आजच्या पिढीत क्वोचितच सापडतात. खूप निग्रही, निष्ठावंत, मेहनती होतीस तू आई.

खूप धावपळ, खूप काम केलंस. खूप खस्ता खात, कष्ट करत आम्हाला वाढवलंस. कधीच त्या कष्टाची तक्रार केली नाहिस.

पण वयानुसार मन मोठं होत असलं तरी शरीर थकतं हेही समजून घायला हवं होतंस ना गं आई!

का ग अंगावर काढलंस सगळं?

पत्ताच लागू दिला नाहीस काहीच. ३ दिवसात होत्याचं नव्हतं झालं ! माझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं आई………

बाबा हाक मारता येत नव्हती आता आई हाक मारली तर ओ द्यायला कुणीच नसेल का गं ???

पुढे तेजस्वीनी लिहिते की,

आई

तू कलाकार म्हणून भन्नाटच होतीस, आहेस आणि राहशील.

तुझ्या भारदस्त आवाजाने आणि पाणीदार डोळ्यांनी तू प्रेक्षकांना कायम भारावून टाकायचीस…..

कलाकार हा नेहमीच त्याच्या कलाकृतीतून जिवंत राहतो.

त्यामुळे तू आहेसच , असशीलच.

तुझ्यावरचं प्रेक्षकांचं प्रेम बघून खूप कौतुक वाटायचंच, ह्यावेळेला मात्र अभिमानाने ऊर भरून आला.

तुझ्यासारख्या कलाकाराच्या पोटी मी जन्माला आले ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय !!

आणि माझी काळजी करू नकोस. तू स्वतः आयटीत जगलीस, त्यामुळे मला जसं वाढवलं आहेस तशीच मी जगेन. रूबाबात. fearless. जिंदादिल. आणि दीदी आणि कथा ची काळजी घेईन. तुझ्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आम्ही दोघी मिळून पूर्ण करू ! तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन आणि तुझा प्रेरणादायी प्रवास त्या पुस्तकरूपी वाचकांसमोर/ प्रेक्षकांसमोर आणेन.

आता तरी तू आराम कर.

तुझा पुढचा प्रवास ज्योतीर्मय, शांतीने आणि आनंदात होऊदेत.

बाबावर करायचं राहिलेलं सगळं प्रेम करून घे. तुम्हाला आता कुणी वेगळं करू शकत नाही. Cheers 🍻

बाबाला माझ्याकडून पप्पी दे. आणि दोघेही आमच्यावर लक्ष ठेवा आणि आशीर्वाद देत रहा बस !!

Until we meet next…….

I Love You 🥹💕

Happy Birthday 🫶🏼

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारला दंगल घडवायची आहे..." जरांगेंचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारने पाठवलेल्या लोकांचा गोंधळ" जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन....

Mumbai Police : 'त्या' गोष्टीनंतर शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेर सुरक्षा वाढवली