काही दिवसापूर्वी यवत परिसरातील एका तरुणाने मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली होती. व्हाट्सअप ग्रुपवर एका तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर तरुणाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. एका धार्मिक स्थळावर लावलेल्या झेंड्यामूळे दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव वाढला आहे.
काल यवतमध्ये गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची हिंदू जन आक्रोश सभा झाली होती. त्यानंतर जमावाने प्रथम एका मशिदीवर दगडफेक केली. त्याच वेळी जमावाने मशिदीवर भगवा ध्वज फडकावला. यामुळे परिसरात जाळपोळ सुरु झाली आहे.
दरम्यान, यवत गावामध्ये तणावपूर्ण शांतता जरी असली तरी अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहे. जाळपोळीत एका दुकानाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दुकानातील पैशांच्या नोटा देखील जळून खाक झाल्या आहेत.