नांदेडमध्ये मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला असल्याचे सांगितले जात आहे.
8 जण अजूनही विहिरीत अडकल्याची माहिती मिळत आहे. सर्व महिला मजूर हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात होत्या त्यावेळी हा अपघात झाला. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला.
यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं.