ताज्या बातम्या

Lalbaug Bus Accident: लालबागमध्ये भीषण अपघात! 9 जण गंभीर जखमी, तर एकाचा मृत्यू

बाप्पाच्या आगमनात लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात भीषण अपघात झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

बाप्पाच्या आगमनात लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसने तब्बल 9 प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

लालबागमध्ये काल रात्री घडलेल्या अपघातात 66 नंबरच्या बेस्ट बसनं 9 जणांना धडक दिली. बस अनियंत्रित झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमधून एक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. एक मद्यधुंद प्रवासी चालक आणि वाहकासोबत वाद घालत होता. त्यानंतर या मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरला ओढलं आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला.

रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात 9 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी दोन महिलांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती अजून चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य