ताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 7 ते 8 वाहनांची धडक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारत गोरेगावकर, रायगड

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. 7 ते 8 वाहनं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. खोपोली एक्झिटजवळ वाहनं एकमेकांवर आदळली आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रकचा समावेश असून अपघातात काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर खोपोली पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील खोपीलीजवळील एक्झिट जवळ हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा