ताज्या बातम्या

मुंबई-वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; 3 जखमी

दोन कारच्या धडकेत 3 जणं गंभीर जखमी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Express Highway) भीषण अपघात (Accident) झाला. होंडा सिटी कारने महिंद्रा जीपला मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे 3.30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान, पुढील तपास दिंडोशी पोलिस करत आहेत.

माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर भरधाव वेगात असणारी होंडा सिटी कारने महिंद्रा जीपला मागून धडक दिल्याने महिंद्रा जीप पलटी झाली. जीपमध्ये चार जण प्रवास करत होते. यातील तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. तर, होंडा सिटी कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

जीपच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, तो प्रवाशांना घेऊन बोरिवलीच्या दिशेने जात होता, तेव्हा दिंडोशीजवळ होंडा सिटीने जीपला धडक दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."