Admin
ताज्या बातम्या

तुर्की-सीरियात भयानक भूकंप; मृतांचा आकडा 21000 पार

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. तुर्की आणि सीरियामध्ये मोठी नैसर्गित आपत्ती कोसळली आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 21 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे. भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे.

भारतीय NDRF कडून श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यादरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. NDRF ने चिमुकलीला वाचवल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते